हैद्राबाद गॅझेट म्हणजे काय?
Hyderabad Gazette : हैदराबाद गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणासाठी का महत्वाचे? Hyderabad Gazette मराठा आरक्षणासाठी मुंबई मागील ५ दिवसापासून उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला अखेर आज यश आलं आहे. आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती, ती सरकारने मान्य करत सरकारने तातडीने हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करणार असल्याची ग्वाही दिली. तसेच याबाबतचा जीआर सुद्धा जारी करणार असल्याचं सांगितलं. सरकारच्या या निर्णयानंतर मनोज जरांगे पाटील यांनीही समाधान व्यक्त केलं. परंतु हैदराबाद गॅझेट म्हणजे नेमकं काय आहे? हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीमुळे मराठा समाजाला कसा फायदा होईल हे तुम्हाला माहितेय का? चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो. हैदराबाद गॅझेट म्हणजे 1918 साली तत्कालीन हैदराबाद निजामशाही सरकारने जारी केलेला आदेश/गॅझेट ,… त्याकाळी हैदराबाद संस्थानामध्ये मराठा समाज बहुसंख्य होता आणि त्यांची सत्ता व नोकऱ्यांमध्ये उपेक्षा होत असल्याची नोंद होती. त्यामुळेच निजामने आपल्या संस्थानात मराठा समाजाला “हिंदू मराठा” अशी नोंद करून शैक्षणिक व ...